41.9 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Jan 14, 2018

मेळाव्यात ३२ शाळांचा सहभाग

गोंदिया,दि.14 : भारत स्काऊटस आणि गाईड्स जिल्हा संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्तवतीने ग्राम पुराडा येथील शासकीय...

संत चोखामेळा पुरस्काराची सुरूवात यावर्षापासून करणार- राजकुमार बडोले 

राज्यातील पहिला पुरस्कार प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना गोंदिया,दि.14, चौदाव्या शतकात जातीव्यवस्थेच्या विरोधात संतसाहित्यातून बंड पुकारणारे संत चोखामेळा यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या प्रबोधनकार तसेच समा जात जातीय धार्मिक सलोखा जपून स्वातंत्र्य, समता, बंधुता सामाजिक न्याय,व्यसनमुक्ती अशा क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वर्षापासून संत चोखामेळापुरस्कार देणार अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केली. ते म्हणाले की, संत चोखामेळा हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी  संतकवी होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले होते.ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्थायांच्या विळख्यात अडकले. त्यांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणा या गावी झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशेपंचविसाव्या जयंती निमित्त संत चोखामेळा यांच्या जन्मगावातील स्थळाचा विकासहीकरण्यात येईल. यासंबंधीची घोषणा लागलीच करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.संत चोखामेळा यांच्या नावे राज्यातून एका व्यक्तीस पुरस्कार दिला जाईल,पुरस्कारामध्ये एक्कावन्न हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह असे स्वरूप रहाणार आहे. विदर्भातील अकोल्या जिल्ह्यात राहणारे सत्यपाल महाराज हे संत तुकडोजी महाराजांचावारसा जपताहेत.. सप्तखंजिरी भजन करत ते समाजप्रबोधन करतात. दिमडी वाद्याच्यामदतीनं वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करत गावागावांमध्ये जागर करतात. विनोदीशैलीनं विषयाची मांडणी करत श्रोत्यांचं मनोरंजनही करतात, अशा प्रबोधनकारास संतचोखामेळा यांच्या नावाचा पहिला पुरस्कार देण्याचे आम्ही ठरवेल आहे. यासंबंधीची तारिखलवकरच जाहीर केली जाईल असेही बडोले यांनी जाहीर केले.

३० तासानंतर मिळाला शोभेलालचा मृतदेह

गोंदिया,दि.14 : सूर्याटोला येथील तलावात म्हशी धुण्यासाठी गेलेला शेतकरी तलावात बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र तलावात बुडालेल्या शेतकऱ्याचा...

बेरार टाईम्स वर्धापन सोहळा,पालकमंत्र्याचे हस्ते आज होणार विशेषांकाचे प्रकाशन

गोंदिया,दि.14ः- गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या साप्ताहिक बेरार टाईम्स व न्युजपोर्टलच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन आज रविवार(दि.14) बेरार टाईम्स कार्यालय,शिवनगर,अंगुरबगीचा रोड येथे दुपारी 12...

विनयभंग करणार्यास सहा महिन्याची शिक्षा

भंडारा,दि.14ः-शाळेतून घरी परत येणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला भंडारा सत्र न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा ठोठावली. निखील बबन लोणारे रा. भागडी असे शिक्षा सुनावल्या गेलेल्या...
- Advertisment -

Most Read