41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jul 11, 2018

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला आग

अकोला दि.११ :: मलकापूर स्थित अंबिकानगर येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेला बुधवारी (ता.11) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागल्याने तब्बल साडेतीन लाख रूपये जळून...

कालबध्द नियोजनातून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करा-मुख्यमंत्री फडणवीस

 गोंदिया जिल्हा आढावा बैठक गोंदिया, दि.११ : जिल्ह्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील अपूर्ण असलेले...

कॅशबुक मध्येच अडकले संगणक परिचालकांचे मानधन

पंचायत विभागाचा नाकर्तेपणा,कॅपोची स्वाक्षरी करण्यास मनाई गोंदिया,दि.११ : : स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्राम पंचायती अधिक सक्षम होवून गावातील कामात गतीशिलता यावी, व नागरिकांची कामे...

खवल्या मांजरच्या नावावर व्यवहार करणारे आरोपी गजाआड

सडक अर्जुनी,दि.११ : तालुक्यातील कोका अभियारण्य दुधारा येथून  सहा आरोपींनी पैसे अधिक मिळण्याच्या नादात खवल्या मांजर पकडून त्याला व्यवहार धानोरा येथे करीत होते, ही...

भिडेंना अटक, शिक्षक वेतनाच्या मागणीवरून गोंधळ; कामकाज चारदा तहकूब

नागपूर, (विशेष प्रतिनिधी)दि.११ : - शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन आणि नियम 260 नुसार शेतकरी चर्चेत कृषी विभागासह संबंधित विभागाचे...

शिवसेना आमदारांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न

नागपूर,दि.११ : - कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका मांडण्याची संधी नाकारल्याने संतापलेल्या शिवसेना आमदारांसह काँग्रेसचे नितेश...

रद्द झालेल्या सिंचन विहिरी पूर्ण कराव्यात-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.11: यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 16 हजार सिंचन विहिरींचे बांधकाम अपेक्षित होते. यापैकी आठ हजार विहिरी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत रद्द झालेल्या विहिरींना पुन्हामंजुरी देऊन त्या प्राधान्याने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.आज विधानभवन येथे यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, यवतमाळचे पालकमंत्री मदनयेरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री ख्वाजा बेग, डॉ. तानाजी सावंत, मनोहर नाईक, राजेंद्र नजरधने, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारीडॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांतर्गत सिंचनाखाली क्षेत्र आणण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विहिरींद्वारे सिंचन करण्यास वाव आहे.यासाठी 150 मीटरची मर्यादा सोडून सर्व निकष शिथील करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात विविध योजनांमधून 16 हजार विहिरी मंजूर करण्यात आल्यात. मात्र यातीलआठ हजार विहिरी पूर्णत्वास न आल्यामुळे रद्द करण्यात आल्या. या विहिरींसाठी पुन्हा मान्यता घेऊन त्या पूर्ण कराव्यात. शेतकरी त्या पूर्ण करीत नसल्यास इच्छुक शेतकऱ्यांना त्या देण्यातयेऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे.प्रधानमंत्री आवास योजनेसोबतच राज्याच्या शबरी, रमाई, कोलाम आदी घरकुल योजनांची गती वाढवावी. तसेच पोलिस गृहनिर्माण व नवीन पोलिस ठाण्याबाबत गृह विभागाच्याअतिरिक्त्‍ मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व गृह प्रकल्पांना मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  जिल्ह्यातील शासकीय आणि ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमीत घरांचे झोपडपट्टी सुधारणा कायद्यांतर्गत पुनर्वसन करून विकास नियमावलीप्रमाणे पट्टे देण्यात यावे. याठिकाणी रस्ते आणि खुल्या जागेच्या नियमाचे पालनकरण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांनी दिल्या.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे, धडक विहिरी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, समृद्धी महामार्ग, जलसिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंप विज जोडणी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, पीककर्ज आढावा, पीक विमा योजना,राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आदींचा आढावा घेतला.

राज्यसभेतील खासदार 22 भाषांमध्ये बोलू शकणार

नवी दिल्ली,दि.11(वृत्तसंस्था)- येत्या पावसाळी अधिवशेनापासून राज्यसभेतील खासदारांना 22 भाषांचा वापर करता येणार आहे. राज्यघटनेच्या 8 व्या सूचीत नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये खासदार बोलू शकतील...

झाडे, झाडिया समाजाला भटक्या जमातीचे प्रमाणपत्र द्या: आ.डॉ.देवराव होळी

गडचिरोली,दि.११: गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असलेल्या झाडे, झाडिया समाजाला भटक्या जमातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा...

विधानभवन परिसरात नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ

नागपूर, दि. 11 जुलै :  विधानभवनाच्या मुख्य इमारतीच्या पश्चिम बाजुला असलेल्या विस्तारीत दोन मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. विस्तारीत इमारत येत्या...
- Advertisment -

Most Read