41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jun 21, 2019

शहर के विकास के लिए मुख्यमंत्री से विशेष अनुदान राशि की मांग

मुख्यमंत्री द्वारा नगर अध्यक्ष बारेवार का अभिनंदन ------------------------------- गोरेगांव,दि.१९-- नगर विकास पैनल के भाजपा में विलय के बाद आमदार विजय रंहागडाले के नेतृत्व में माजी सभापती...

नांदेड,यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्तीभागात भूकंपाचे सौम्य धक्के

यवतमाळ,दि.21 : जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास 8 ते 10 सेकंद 3.9 रिक्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात...

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी योगसाधना आवश्यक – डॉ.कादंबरी बलकवडे

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा गोंदिया, दि.२१.: योगसाधना ही भारताने संपूर्ण जगाला आणि मानवतावादाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अनन्यसाधारण महत्व...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन तेलंगणातील कालेश्वरम प्रकल्पाचा

गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना लाभ मुंबई, दि. 21 : तेलंगणा राज्यातील विविधोपयोगी लिफ्ट पाणीपुरवठा योजनांचा समावेश असणाऱ्या कालेश्वरम प्रकल्पाचे (मेडीगट्टा बॅरेज) उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले....

गडचिरोली जिल्हयात योग दिनाचे उत्साहात आयोजन

गडचिरोली,दि. २१:- आंतरराष्ट्रीय योग दिन आज दि. २१ जुन २०१९ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्हयात अतिशय शिस्तबध्द व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. जिल्हा मुख्यालयी आयोजित...

योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, २१ जून, : : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन...

सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,२१ जून, : ज्या बॅंकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅंकामध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन...

देवरीचा योजन कावळे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिला

जिल्हा परिषद शाळेची उत्तम कामगिरी     देवरी,दि.21- यावर्षी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देवरीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी योजन धनवंत कावळे याने जिल्ह्यात प्रथम...

सिकलसेल जागृती दिवस कार्यक्रम बिजीडब्ल्यू हॉस्पिटल येथे संपन्न

गोंदिया,२१ जून:- सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशींचा रोग असुन प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचितप्रसंगी वयस्कांमध्येही हा रोग आढळतो. मध्य भारतात, काही विशेष जाती-जमातीत हा रोग...

योग जीवनाचा अविभाज्य भाग- हृषीकेश मोडक

वाशिम, दि.21- आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात  तंदुरुस्त राहण्यासाठी काही जण जीममध्ये जातात. कुणी धावतात तर कुणी व्यायाम करतात. प्रत्येक भारतीयाने  शारिरिकदृष्टया तंदुरुस्त राहून मानसिकदृष्टया सक्षम झाले पाहिजे. संपन्न आयुष्य जगण्यासाठी योग महत्वाचा असून योग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असेप्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक  यांनी केले.       आज 21 जून रोजी वाशिम येथील वाटाणे लॉनमध्ये 5 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, भारत सरकार,महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मोडक यावेळी बोलत होते. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, पतंजलीचे डॉ. भगवंतराव वानखेडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे डॉ. हरीष बाहेती, विद्याभारतीचे दिलीप जोशी,स्वामी सत्यानंद योग केंद्राचे राम छापरवाल, वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.       श्री. मोडक पुढे म्हणाले, भारतीय संस्कृतीत योगाला महत्व आहे. प्रत्येकाने सुखी संपन्न निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग केले पाहिजे. योग केवळ योग दिवस आहेम्हणून न करता तो दररोज नियमितपणे केला पाहिजे, असे सांगितले.      योग दिनाचे औचित्य साधून डॉ. भगवंतराव वानखेडे, विजय चव्हाण आणि दीपा वानखेडे यांनी उपस्थित योगसाधकांना योगमुद्रा, ध्यानमुद्रा, वक्रासन, वज्रासन,उत्तानपादासन, पवनमुक्तासन, कपालभारती, प्राणायाम, भद्रासन यासह विविध योग शिकविले. शौर्य वानखडे या बालकाने देखील विविध प्रकारचे योग करुन उपस्थित योगसाधकांकडून प्रशंसा    मिळविली.पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, विद्याभारती, स्वामी सत्यानंद योग केंद्र, भारत स्वाभिमान, भारत स्काऊट गाईड, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना,लॉयन्स क्लब, नेहरु युवा केंद्र, व्यंकटेश योग अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. योगसाधक म्हणून विविध क्षेत्रातील व्यक्ती,विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.      यावेळी 20 जून रोजी पतंजली परिवार आणि आर्ट ऑफ लिव्हींग परिवाराच्या वतीने माँ गंगा मेमोरिअम ट्रस्टच्या श्री.श्री. रवीशंकर हॉलमध्ये रांगोळी स्पर्धेतील विजेतेप्रतिक्षा वानखेडे, भारती गटलेवार, सायली जहागीरदार, प्रियंका गोळे, राजेश खंडाळकर यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.       प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत वृक्षाचे रोपटे भेट देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी तानाजी नरळेयांनी केले. संचालन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटिये यांनी केले. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी श्री. उप्पलवार यांनी मानले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!