सरपंच निवडीला कोर्टाचा स्थगणादेश

0
19

ग्रामपंचायत तेढा व निंबा येथील प्रकरण : आरक्षणावर आक्षेप
गोरेगाव दि.५-: चुकीची आरक्षण सोडत असल्याचे आक्षेप असल्याने तालुक्यातील तेढा व निंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीवर उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने २ जुलै २०१५ रोजी दुपारी २ वाजता गोरेगाव तहसिल कार्यालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावर आक्षेप आल्याने नव्याने आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश २९ जुलै रोजी धडकले होते. त्यानुसार ३१ जुलै २०१५ रोजी ५६ ग्रामपंचायतीसाठी नव्याने आरक्षणाची ईश्वरचिट्टी पद्धतीने सोडत काढण्यात आली. यापुर्वी २०१० मध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या तेढा, निंबा, हिरडामाली, झांझीया, भडंगा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पुन्हा महिला आरक्षण आले. आरक्षणाची सोडत काढत असताना यापुर्वीच्या आरक्षणाचा विचार करणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. निंबा ग्रामपंचायतीत तर सलग चार पंचवार्षिक महिलांसाठी राखीव असल्याचे समजते. आरक्षण सोडतीदरम्यान तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा गोरेगावचे तहसिलदार उपस्थित होते. दरम्यान तेढा आणि निंबा येथील आरक्षणावर काही कार्यकत्र्यांनी तोंडी आक्षेप घेतले. मात्र, लेखी आक्षेप हवे असल्याचे अधिकाNयांनी सांगताच लेखी आक्षेप देखील नोंदविण्यात आले. त्याची प्रतिलिपी जिल्हाधिकारी तथा निवडणुक आयुक्तांना पाठविण्यात आल्या. मात्र, या आक्षेपांना न जुमानता संबंधीतांनी ३ ऑगस्टपासून सरपंचपदाच्या निवडणुकी संदर्भात सुचना काढल्या. अखेर तेढा येथील नवनिर्वाचित सदस्य डॉ.विवेक मेंढे व इतर सहा सदस्यांनी तथा निंंबा येथील तिन सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली असता दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीला स्थगिती आली आहे. आरक्षणाची सोडत काढताना आक्षेपांकडे दुर्लक्ष झाल्याचे तक्रारकत्र्यांचे म्हणणे आहे.