सीईओंच्या बैठकीवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

0
3

आमगाव दि.५: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा संघटनेने १ ऑगस्टपासून जिल्ह्यात असहकार आंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत संघटनेने पंचायत समितीत आयोजित सीईओंच्या आढावा बैठकीवर बहिष्कार घातला.
योगेश रुद्रकार या कर्र्म‍यावर केलेली कारवाई मागे घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, विस्तार अधिकार्‍यांची पदे पदोन्नतीने भरावी, आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांची तालुकास्तरावर पुरस्कारासाठी निवड करावी, सेवेतील कालबद्ध प्रकरणे निकाली काढावी, अस्थायी ग्रामसेवकांना स्थायी करावे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांची सेवाजेष्ठता यादी प्रकाशित करावी, नोव्हेंबर २00५ पूर्वी लागलेल्या कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडण्यात यावे, मासिक वेतनाची पुर्तता तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना सुरक्षा निधीचे आवरण तत्काळ व्हावे, तेराव्या वित्त आयोगातील खरेदी केलेले प्रिंटर ग्रामपंचायतींना तत्काळ देण्यात यावे, ग्रामविकास अधिकार्‍यांची पदे लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण करण्यात यावे, आंतर जिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले.
संघटनेने मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे लेखी स्वरुपात निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु शासनाने कोणतीच दखल घेतली नाही.
या मागण्यांसंदर्भात ग्रामसेवक संघटनांशी साधी चर्चासुद्धा घडवून आणण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संघटनेने जिल्हास्तरावर १ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यातच संघटनेने मंगळवारी (दि.४) आमगाव पंचायत समिती कार्यालयात आयोजित आढावा बैठकीवर बहिष्कार घातला.