विदर्भात मुसळधार

0
9

गोंदिया, दि.५-विदर्भात दोन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस होत असून, यामुळे नदी नाल्‍यांना पूर आला आहे. दरम्‍यान, अकोला परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आला आहे. त्‍यामुळे अकोल्‍याकडून अकोटकडे जाणारी वाहतूक ठप्‍प झाली आहे. गांधीग्राम पुलाच्‍या 10 फुटावरून पाणी वाहत आहे. अशीच परिस्थिती वाशीम जिल्‍ह्यातही आहे. दरम्‍यान, अमरावती जिल्‍ह्यातील दर्यापूर येथे एक वृद्ध पुरात वाहून गेल्‍याचे वृत्‍त आहे.
गोंदिया जिल्ह्यात १ जून ते ५ ऑगस्ट २०१५ या कालावधीत १८६२१ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी ५६४.२ मि.मी. इतकी आहे. आज ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३३ मंडळात ५१९.९ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १५.५ मि.मी. इतकी आहे.
‍ ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १२७ मि.मी. (१८.१ मि.मी.), गोरेगाव तालुका- ४५.४ मि.मी. (१५.१ मि.मी.), तिरोडा तालुका- १८७.८ मि.मी. (३७.५ मि.मी.), अर्जुनी मोरगाव तालुका- ३०.३ मि.मी. (६ मि.मी.), देवरी तालुका- २० मि.मी. (६.७ मि.मी.), आमगांव तालुका- ३४.६ मि.मी. (८.७ मि.मी.), सालेकसा तालुका- १७.४ मि.मी. (५.८ मि.मी.) आणि सडक अर्जुनी तालुका- ४९.५ मि.मी. (१६.५ मि.मी.) असा एकूण ५१९.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १५.५ मि.मी. इतकी आहे.