ओबीसी शिष्यवृत्ती वाढविण्याची मागणी

0
12

मोहाडी दि.२१:: इतर जाती जमातींच्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती अल्प प्रमाणात असल्याने ग्रामीण भागातील गरीब व शेतकर्‍यांच्या मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढविण्यात यावी या प्रकारचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोहाडीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार मोहाडीतर्फे पाठविण्यात आले. निवेदन देताना राविकाँ शहर अध्यक्ष शोमल गजभिये, राकाँपा सचिव विजय पारधी, विशाल पारधी, अवधेश निमजे, लोचन पराते, स्वप्नील पराते, कपील पारधी, विपुल भानारकर, पंकज निमजे, शुभम पिंगरे, शफी शेख, उज्वल रंगारी, मनोज निखाडे, कदीर शेख, दानिश शेख, विजय गायधने आदी विद्यार्थी उपस्थित होते.