दुस-या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी

0
17

नवी दिल्ली,दि.२१- एक सप्टेंबरपासून देशातील सर्व प्रकारच्या बँका महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारी बंद रहाणार आहेत.महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारी सुट्टी मिळावी, ही बँक कर्मचा-यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या, तिस-या व असेल तर पाचव्या शनिवारी बँका सुरू राहणार आहेत.
वेतनवाढीसह दोन शनिवारच्या सुट्टीच्या मागणीबाबत ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ने (एआयबीईए) इंडियन बँक्स असोसिएशनकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने अधिसूचना जारी केली असून बँक कर्मचा-यांना महिन्यातील दोन आठवडे पाच दिवसांचा आठवड्याचा लाभ मिळणार आहे.
रिझर्व्ह बँक कायदा, १९३४च्या दुस-या परिशिष्टांतर्गत येणा-या सर्व म्हणजेच सरकारी, सहकारी, खासगी, ग्रामीण प्रादेशिक बँकांतील कर्मचा-यांना आता प्रत्येक महिन्यात दोन दिवस वाढीव सुट्टी मिळणार आहे.