किकरीपार येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

0
15

आमगाव दि. ३१: किकरीपार येथे आठ आरोग्य योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच कविता मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच डुडेश्‍वर भूते होते. अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सिंधू भूते, रज्जू भक्तवर्ती, मेघशाम मोटघरे, सचिन हेमणे, गीता महारवाडे, दर्शना मेश्राम, अमोल मेंढे, सचिव एल.डी. तावडे, नरेंद्र मेश्राम व नागरिक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपसरपंच डुडेश्‍वर भूते म्हणाले गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिक्षण, आरोग्य यांना अग्रस्थानी ठेवून संपूर्ण गावाचा विकास करण्याचा मानस आमचा आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय विकास अशक्य आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावे, असे आवाहन डुडेश्‍वर भुते यांनी केले.