सरकारच्या चुका पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे-खा.पटेल

0
16

भंडारा दि. ३१: गावांगावात राकाँचा पक्ष आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी उत्तम कार्य केले.ज्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. परंतु आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिक यश प्राप्त करण्यासाठी व संघटना बनवण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. आता सरकारच्या चुका सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादीच्या व वरिष्ठ नेत्यावर सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खा.प्रफुर्ल्ल पटेल यांनी केले.
येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित राकाँ कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ.राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, मधुकर सांभारे, धनंजय दलाल, तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, भंडाराचे नगराध्यक्ष बाबू बागडे, सच्चिदानंद फुलेकर, अविनाश ब्राम्हणकर, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, देवेंद्रनाथ चौबे, नरेंद्र झंझाड, डॉ.श्रीकांत वैरागडे, विलास काटेखाये, स्वप्नील नशिने, भगीरथ धोटे, धनंजय सपकाळ, धनराज साठवणे, जयेश संघानी, राजू सलाम,बाळा गभणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.
पटेल म्हणाले,जिल्हा परिषदमध्ये समविचार पक्षाची आघाडी व्हावी, याकरिता आज जिल्हा परिषदमध्ये दोन सभापती व उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. यापुढे आपल्या कार्यकर्त्यांना हक्काचे स्थान मिळाले आहे आणि पुढे सुद्धा स्थान टिकविण्यासाठी राकाँ संघटना मजबूत होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काही कामात अपयश मिळाले असले तरी खचून जाण्याची गरज नाही. कारण मानवाच्या जीवनात यश आणि अपयश ही बाजू राहते. तेव्हा कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने पुढे कार्य सुरु ठेवावे. कारण येणार्‍या दोन महिन्यात मोहाडी, लाखनी, लाखांदूर, नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा आपसातील मतभेद विसरून कामाला लागा असा सल्ला दिला. केंद्र सरकारची खरडपट्टी काढताना शासनाच्या विरोधी नितीमुळे सामान्य जनतेला पुढे अच्छे दिन च्या ऐवजी बुरे दिन पहावे लागणार आहे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे आता जनतेचे प्रकरण सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तयार व्हावे लागेल असे सांगितले. प्रास्ताविक महासचिव धनंजय दलाल यांनी संचालन विजय खेडीकर यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश ब्राम्हणकर यांनी केले.