पेट्रोल २ रुपयांनी तर डिझेल ५० पैशांनी स्वस्त

0
17

नवी दिल्ली, दि. ३१ – महागाईने त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. आज (सोमवार) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी पेट्रोलच्या दरात १ रुपया २७ पैशांनी, तर डिझेलच्या दरात १ रुपया १७ पैशांनी (प्रति लिटर) कपात करण्यात आली होती. तसेच १ ऑगस्ट रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे २ रुपये ४३ पैसे व ३ रुपये ६० पैशांनी कपात करण्यात आली होती.