पी. व्ही. चंद्रन आयएनएसचे नवे अध्यक्ष

0
13

वृत्तसंस्था, बंगळुरू-दि.१९-दि इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘मातृभूमी’ वृत्तपत्र समूहाचे पी. व्ही. चंद्रन यांची २०१५-१६ या वर्षांकरिता अध्यक्षपदी निवड झाली.
‘राष्ट्रदूत’ साप्ताहिकाचे सोमेश शर्मा यांची डेप्युटी प्रेसिडेंट म्हणून, ‘बिझिनेस स्टँडर्ड’च्या अकिला उरणकर यांची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून, तर मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स) यांची मानद कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. व्ही. शंकरन हे नवे सरचिटणीस असतील. किरण बी. वडोदरिया यांच्या जागी निवड झालेले चंद्रन हे मातृभूमी वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत. अनेक वर्षांपासून ‘आयएनएस’च्या कार्यकारी समितीवर असलेले चंद्रन हे २०१३-१४ मध्ये संघटनेचे व्हाइस प्रेसिडेंट, तर २०१४-१५ साली डेप्युटी प्रेसिडेंट होते.
सोसायटीची २०१५-१६ सालाकरिता ४१ सदस्यांची नवी कार्यकारिणी समिती निवडण्यात आली आहे. विवेक गोएंका (द इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), पवन अग्रवाल (दैनिक भास्कर, भोपाळ), विजयकुमार चोपडा (पंजाब केसरी, जालंधर), विजय दर्डा (लोकमत), महेंद्र मोहन गुप्ता, शैलेश गुप्ता (मिड-डे), राजकुमार जैन (नवभारत टाइम्स), मनोजकुमार सोंथालिया (द न्यू इंडियन एक्स्प्रेस), किरण ठाकूर (तरुण भारत, बेळगाव), एम. व्यंकटेश (हिंदुस्थान टाइम्स) व प्रताप पवार (सकाळ) आदींचा समावेश आहे.