राज्यात पेट्रोल, डिझेल, विडी, दारू महागणार

0
23

वृत्तसंस्था
मुंबई दि.३०- महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा चटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. याच बरोबर सोन्या-चांदीच्या भावातदेखील वाढ होणार आहे.
दुष्काळ निधीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारुवर पाच टक्के अतिरिक्त कर आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय वाढलेल्या किंमती गुरुवारी मध्यरात्री पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे