स्वच्छता अभियानात सहभागी व्हा-मेंढे

0
19

गोंदिया,दि.३० -संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता अभियानात देखील लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छतेचा उपक्रम राबवावा. नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारी (दि.२९) राष्ट्रीय स्वच्छता अभियान व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या संयुक्त उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा रचना गहाणे, सभापती पी.जी. कटरे, देवराम वडगाये, छायाताई दसरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, दुर्गा तिराले, सुरेश हर्षे, किशोर तरोणे, कमलेश्वरी लिल्हारे, श्यामकला पाचे, जि.प. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए. देशमुख उपस्थित होते. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असायला हवा. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने परिसर स्वच्छतेचा संकल्प करीत इमारतींच्या आतमधील परिसर संबंधित विभागाने तर बाह्य परिसर पदाधिकाèयांनी स्वच्छ करण्याचे निर्देश सुद्धा जि.प. अध्यक्षा मेंढे यांनी दिल्या. डासांचे प्रमाण वाढले, त्यामुळे डेंग्यु, मलेरिया सारखे आजार मूळ धरू लागले आहेत. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पाळल्यास या आजारापासून अबाधित राहता येते. त्यासाठी स्वच्छता अभियानाला तरणोपाय नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गावडे यांनी केले. स्वच्छता अभियान कागदावर राहू नये, आपल्या प्रशासकीय इमारतीपासून त्याची सुरुवात व्हायला हवी. खर्रा आणि पान खाऊन qभती रंगविणे बंद झाले पाहिजे. शेवटच्या पातळीवरील व्यक्तीने ठरविले तरच अभियान यशस्वी होईल. माझे कर्तव्य मी विसरता कामा नये. कर्तव्यदक्षता नागरिकांमध्ये आली तरच अभियान यशस्वी होणार असल्याचे मत जि.प. उपाध्यक्ष गहाणे यांनी व्यक्त केले. समृद्ध आणि बलशाली देशासाठी आरोग्याची जोपासना केली पाहिजे. सामाजिक बांधीलकीतूनच स्वच्छता अभियान यशस्वी करता येईल. आपण स्वच्छता अभियान यशस्वी केले तर संत गाडगेबाबांना तीच खरी श्रद्धांयली ठरेल, असे मत आरोग्य व शिक्षण सभापती कटरे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक माहिती शिक्षण आणि संवाद तज्ञ राजेश उखळकर यांनी केले. संचालन समाजशास्त्र तज्ञ श्रीमती दिशा मेश्राम यांनी केले. आभार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुकाअ आर.ए.देशमुख यांनी मानले. यशस्वितेसाठी एच.आर. गौतम, जितेंद्र येरपुडे, अतुल गजभिये, सूर्यकांत रहमतकर, बी.ओ. पटले, देवानंद बोपचे, भागचंद रहांगडाले, तृप्ती साकुरे, विशाल मेश्राम, शोभा फटींग, मुकेश त्रिपाठी, सचिन रोडी, रमेश उदयपुरे यांनी परिश्रम घेतले