श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह ४ पासून

0
19

गोंदिया,दि.३० -श्रीनगर येथील मालवीय शाळेच्या प्रांगणावर ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान श्रीमद् भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. पंडीत राजदेव तिवारी, पंडीत जयनारायण तिवारी व तिवारी परिवारातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत रमेशभाई ओझा यांचे शिष्य जनार्दनभाई व्दिवेदी हे सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० व दु. ३.३० ते सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान कथावाचन करणार आहेत. ४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता मंगलकलश यात्रा पोथी परिभ्रमण शहरातून करण्यात येणार आहे. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.