जिल्ह्यातील पहिल्या डिजीटल शाळेचा मान पलखेडाल्या

0
14

गोरेगाव,दि.३- गोंदिया जिल्हा तसा शिक्षण क्षेत्रात पुढारलेला,शिक्षणाच्या सोयी असल्याने साक्षरतेचेही प्रमाण चांगले आहे.त्यातच आता जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षणातही दिवसेंदिवस सुधारणा होऊ लागली असून उपक्रमशिल शिक्षकांच्या पुढाकारामुळेच गोंदिया जिल्ह्यात डिजिटल शाळेचा प्रयोग राबवयाला सुरवात झाली आहे.अशाच जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल उपक्रमाचे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पलखेडा येथे जिल्हाधिकारी यांच्याहस्ते आज शनिवारला शुभारंभ करण्यात आले.कार्यक्रमाला उपसभापती सुरेंद्रं बिसेन,जि.प.सदस्य ज्योतीताई वालदे, अल्काताई कोठेवार, ललिता बाहेकार, किशोर गौतम, तहसीलदार बि. एन. बांबोडे, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे,गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, मनोज अग्रवाल व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
तालुक्यातील पलखेडा या छोटयाश्या गावातुन करण्यात आली असून येथील गावकरी व शिक्षकांनी लोकवर्गणीतुन या उपक्रमाला सुरुवात केली आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी पलखेडा या छोट्याश्या गावांने आज शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात आपल्या नावाची नोंद केली. पलखेडा या गावाला जिल्ह्यातील प्रथम डिजिटल शाळा घडविण्याचा मान मिळाला आहे. उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी होते. अतिथी म्हणून
लोकसहभागातून डिजिटल शाळेची संकल्पनेला मुर्त रूप देण्यासाठी या वर्गणीच्या माध्यमातून ६० हजार रूपये गोळा केले.गावकèयांनी मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल शाळेचे संकल्प गाठून उत्कृष्ट उदाहरण ठेवले आहे. जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळेसाठी पलखेडाचे शिक्षक युवराज माने व मुख्याध्यापिका के. आर. भोयर यांनी विशेष प्रयत्न केले तर गावातील सरपंच चंद्रकलाबाई सय्याम, उपसरपंच केशवराव बिसेन, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, बीडीओ दिनेश हरिणखेडे, सहायक बीडीओ श्रीकृष्ण इंगळे, उपसभापती सुरेंद्र बिसेन, केंद्रप्रमुख आर. आर. अगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमराज सय्याम तथा गावातील गावकèयांनी स्वंय प्रेरणेने डिजिटल शाळेची संकल्पना घडवून आणली.
डिजिटल शाळेसाठी गावकèयांनी प्रोजेक्टर, स्क्रीन, मास्टर टेब, साउंड सिस्टम इत्यादी साहित्याची खरेदी करून ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना शिकविण्याची सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग असून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी या गावाचे कौतुक केले आहे. या शाळेत २ शिक्षक, तसेच १ ते ४ पर्यंत वर्ग मिळून पटसंख्या ३० आहे. डिजिटल शिक्षणामध्ये डाक्युमेंटरी तसेच ई-पुस्तक, चित्र, गणित आदि विषय या माध्यमातून शिकवले जातील. सोबतच विद्याथ्र्यांचे दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी ही पद्घती उपयोगी ठरणार आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी गावकèयांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की डिजिटल शाळेची ज्योत ही संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्वाचा केंद्र qबदू ठरणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प.स.सभापती दिलीप चौधरी यांनी डिजिटल शाळेला गावातील नागरिकांचा यश सांगून गावातील विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण घेवून विभिन्न प्रकारचे रोजगार प्राप्त करतील व गावाची प्रगती होणार असल्याचे सांगितले.