केंद्र शासनाकडून शेतकर्‍यांची दिशाभूल

0
18

चंद्रपूर दि.३१: भारत कृषीप्रदान देश आहे. शेतकर्‍यांना सन्मान मिळावा व शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यमान सरकारकडून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.
चंद्रपूर जिल्हा विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी स्थानिक गांधी चौकात डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक प्रशांत दानव, उषा धांडे, जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर, बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चंद्रशेखर पोडे, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्‍वर मेश्राम, माजी सभापती अँड. हरिश गेडाम, नासिर खान, मजदूर सभेचे महासचिव वसंतराव मांढरे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.