राष्ट्रीय एकता व संकल्प दिनानिमित्त एकता दौड

0
24

गोंदिया, ३१ : देशाचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन आणि माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून आज(ता.३१) साजरी करण्यात आली.
गुजराती राष्ट्रीय विद्यालयात यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केले. यावेळी नगराध्यक्ष कशिश जायसवाल, प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष कळमकर, दिपक पटेल, जयेश पटेल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी उपस्थित विद्यार्थी, व्हाईट आर्मी, एस.सी.सी. स्काऊड-गाईड तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची व राष्ट्रीय संकल्प दिनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विद्यालयात आगमन होताच महात्मा गांधीच्या अर्धाकृती पुतळयाला पालकमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केला .
राष्ट्रगीतानंतर गुजराती राष्ट्रीय विद्यालय ते इंदिरा गांधी स्टेडिअम दरम्यान आयोजित राष्ट्रीय एकता दौडला पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली. दौडची सांगता इंदिरा गांधी स्टेडिअमजवळ झाली.