जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक संघाचा मोर्चा

0
16

गोंदिया,दि.३१ : अंशदायी पेंशन योजनेच्याविरूद्घ व जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा अंशदायी पेंशन योजनेच्या विरोधात आणि इतर मागण्यांना घेऊन काढण्यात आला.त्यामध्ये नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या राज्य शासकीय कर्मचाèयांना अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू आहे, पण या योजनेत कुटूंब निवृत्तीवेतन नाही. कर्मचाèयांच्या मृत्यूनंतर वारसदारास कोणताही लाभ नाही. पत्नीला अनुकंपा नाही, जीपीएफ नाही. नोकरीच्या वेळी लग्नसमारंभ, आजार, अपघात अशा अडचणी उद्भवल्यास पैशा उचलता येईल व समस्या भागविता येईल, यासाठी जीपीएफ खात्याप्रमाणे नवीन कर्मचाèयांचे कोणतेही खाते नाही. सेवानिवृत्तीनंतर मिळणारा लाभ एकदम तुटपुंजा आहे या सर्व बाबींचा शासनाने विचार करण्यात यावे असे म्हटले आहे.मोच्र्यामध्ये जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे,एस.यु.वंजारी,नुतन बांगरे,आंनद पुंजे,केदार गोटेफोडे,गणेश चुटे,अयुब्ब खान,नाननबाई बिसेन,यशोधरा सोनवाने,शंकर चव्हाण,किशोर रहागंडाले आदी शिक्षक संघाचे सदस्य सहभागी झाले होते.