६८ प्रभागासाठी ३३३ उमेदवारांचे भाग्य होणार मशीन बंद

0
16

गोंदिया,दि.३१- जिल्ह्यातील चार नगरपंचायतीच्या ६८ प्रभागासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत ३३३ उमेदवार रिंगणात आहेत.या उमेदवारांचे भविष्य उद्या १ नोव्हेंबरला होणाèया निवडणुकीच्या मतदान यंत्रात बंद होणार आहेत.गोरेगाव मध्ये चौरंगी लढतीचे चित्र असून देवरी,अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथे तिरंगी लढतीचे चित्र आहे.
गोरेगाव, अर्जुनी – मोर, देवरी व सडक अर्जुनी या चार नगर पंचायतीच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. चारही नगर पंचायतीच्या ६८ प्रभागासाठी ४६८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. अर्ज छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात ३३३ उमेदवार राहिले. यात गोरेगाव नगर पंचायतीच्या १७ जागेसाठी भाजपा, काँग्रेस व राँकाचे प्रत्येकी १७ उमेदवार, नगरविकास समितीचे १७, बसपा ३, मनसे २ असे एकूण ७६ उमेदवार रिंगणात आहेत. देवरी नगर पंचायतीत काँग्रेसचे १६, राँका व भाजपाचे प्रत्येकी १७, शिवसेना ५, बसपा ३, गोंडवाना गणतंत्र पार्टी १, मनसे १ व इतर अपक्ष असे ९४ उमेदवार, सडक अर्जुनी येथे काँग्रेसचे १६, भाजपा १७, राँका १७, शिवसेना ३, बसपा १, बाहुबली प्रगती पॅनलचे १२ व अपक्ष १५ असे ८१ उमेदवार तर अर्जुनी मोरगाव येथे भाजपा १७, काँग्रेस १७, राँका १७, शिवसेना १०, नगर युवा मंच १० असे एकूण ८२ उमेदवार तर या चारही नगर पंचायतीच्या एकूण ६८ प्रभागासाठी ३३३ उमेदवार या रणसंग्रामात आपले भाग्य अजमावीत आहेत.