224 प्रवाशांचे रशियन विमान इजिप्तमध्ये कोसळले

0
14

वृत्तसंस्था
सिनाई (इजिप्त) – इजिप्तमधून 224 प्रवाशांना घेऊन रशियाच्या दिशेने जाणारे विमान इजिप्तमधील मध्य सिनाईजवळ कोसळल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला इजिप्तचे पंतप्रधान शरीफ इस्माईल यांनी दुजोरा दिला आहे.

रशियातील कोगालिमाविया कंपनीचे 224 प्रवाशांना घेऊन जाणारे ए-321 क्रमांकाचे जेट विमान इजिप्तच्या शर्म-अल-शेख येथून रशियाच्या दिशेने निघाले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर 23 मिनिटांनी विमानाशी अपेक्षित संपर्क होऊ शकला नाही. सुरुवातीला या विमानाची दिशाभूल होऊन ते बेपत्ता झाल्याचे वृत्त आले. त्यानंतर मात्र विमान मध्य सिनाईजवळ कोसळल्याचे समजले. त्यास इस्माईल यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी या घटनेचा आढावा घेण्यासाठी तातडीची आपत्कालीन बैठक बोलाविली आहे. दरम्यान अपघातस्थळी 45 रग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत.