निधीमुळे रखडला झरी सिंचन प्रकल्प

0
21

लाखांदूर दि.  २४: तालुक्यातील महत्वाच्या झरी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळून दोन वर्षे पूर्णझाले. सदर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाकरिता ६१८.५५६ लक्ष रूपयांची गरज आहे. मात्र, शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्यामुळे प्रकल्प थंडबस्त्यात आहे.
या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे तालुक्यातील दोन हजार पाचशे पंधरा हेक्टर शेती सिंचणाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या मजुरीकरिता चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रकल्पाच्या कामासाठी शासनाने सुरूवातीला ९२.१३९ कोटी रूपये मंजुर केले. परंतु अद्याप शासन निधी उपलब्ध करून दिला नाही. यामुळे प्रकल्पाचे काम अजुनही थंडबस्त्यात आहे. तरी याकडे शासनाने लक्षदेवून सदर निधी उपलब्ध करून कामाला सुरूवात करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील झरी उपसा सिंचन प्रकल्प मागील दोन वर्षापासून निधी उपलब्ध होत नसल्याने या प्रकल्पाला सुरूवात झालेली आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील सुमारे २५ गावातील २,५१५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
हा प्रकल्प मंजुर करण्यासाठी माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी २0 मार्च २00६ ला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थावर मोर्चा, २२ नोव्हेंबर २00७ ला झरी तलावावर उपोषण, १५ ऑगस्ट २00८ ला सहायक मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन, ११ डिसेंबर २00८ ला मुख्य अभियंता कार्यालयासमोर मोर्चा काढला. वेळोवेळी आंदोलन, मोर्चाकाढून शासनाला प्रकल्पाबाबत निवेदनातून पाठपुरावा केला.