पाच रानडुकरांची शिकार

0
12

गोंदिया दि.२५: तिरोडा तालुक्यातील चोरखमारा परिसरात रविवार (दि.२२) रात्री एका रानडुकराची हत्ता करण्यात आली. सोमवारी सकाळी पाच वाजता त्यातील आरोपीला वीज तार काढताना निसर्गप्रेमी सावन बहेकार यांनी पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले. सदर आरोपीने आपण आपल्या सोबत्यांसह आतापर्यंत पाच रानडुकरांनी शिकार केल्याचा कबुली जबाब दिला आहे.

चोरखमारा परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या आधारावर बहेकार यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली. यात शिकार करणाऱ्या आरोपीला विद्युत तारांसह पकडून त्याला अटक करण्यात आली आहे. फागू हरिराम कुंभरे (४५) असे आरोपीचे नाव आहे.

सदर आरोपी चोरखमारा परिसरातील शेतशिवारात विद्युत तार लावून रानडुकरांची शिकार करतो. या प्रकरणाची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता एका महिन्यात पाच रानडुकरांची शिकार करंट लावून केल्याचे त्याने आपल्या बयानात सांगितले. आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एच. शेंडे, वाघाये, सावन बहेकार, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.के. चाटी, एन.पी. वैद्य, के.जी. राणे, एस.डी. उईके, आय.आर. पठान यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.