‘आदर्श ग्राम’साठी लोकसहभागाची गरज

0
8

भंडारा दि.२५:: सांसद आदर्श ग्राममध्ये नाविण्यपूर्ण योजना राबवून लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने काम करावे. आदर्श ग्राममधील प्रत्येक नागरिक आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम व सुदृढ होण्यासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.

सांसद आदर्श दत्तक ग्राम गर्रा-बघेडा येथे नियोजित कामांसाठी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे, सरपंच तरटे, सभापती शुभांगी रहांगडाले, पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख उपस्थित होते.

यावेळी खासदार नाना पटोले यांच्या हस्ते जिल्हा परिषद हायस्कुल व ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या गावातील ४३९ कुटुंबाकडे शौचालय नव्हते. त्यापैकी ३५९ कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी निधी देण्यात आला असून ३३ शौचालये पूर्ण झाले आहेत. मार्च २०१६ पर्यंत प्रत्येकाच्या घरी शौचालये असेल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी सांगितले. गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खत प्लॉन्ट तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.