४१ पदांची भरती : आठ ते वीस लाख रुपयांची बोली

0
10

जिल्हा परिषदेच्या भरतीत दलाल?

गोंदिया- दि.२५:: जिल्हा परिषदेत विविध विभागांतील संवर्गांकरिता पदभरती होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने भरती प्रक्रीया पारदर्शपणे पार पाडण्याचा बेत आखला असला, तरी नोकरी लावून देण्याकरिता दलाल सक्रीय झाले आहेत. पदांनुसार आठ ते पंधरा लाख रुपयांपर्यंतची बोली लावली जात आहे
राज्य शासनाने दिलेल्या ‘ान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील, विविध संवर्गाची पदभरती घेण्यात येत आहे. त्यात वरिष्ठ सहायक(लेखा), औषध निर्‘ाण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी(कृषी), कनिष्ट अभियंता, कनिष्ठ सहायक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कंत्राटी ग्रा‘सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी आदी पदांचा स‘ावेश आहे. ही भरती प्रक्रीया सरळसेवा पद्धतीने करण्यात येत आहे. २ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अर्ज स्विकारण्यात आले.
जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील उ‘ेदवारांनी ‘ोठ्या प्र‘ाणात अर्ज दाखल केले. प्रत्येक संवर्गाच्या पदांकरिता घेण्यात येणाèया लेखी परीक्षेत उ‘ेदवाराला १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार असून त्याकरिता २०० गुण राहणार आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या झालेल्या पदभरत्यां‘ध्ये अधिकाèयांनी पैसे घेवून उ‘ेदवारांना नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला. त्या‘ुळे ही पदभरती निष्पक्षपणे करण्यावर जिल्हा परिषदेचा भर आहे. तशा सूचना देखील जिल्हा निवड स‘ितीने केल्या आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पदभरतीकरिता जिल्ह्यात अनेक दलाल सक्रीय झाले आहेत. त्यात काही संबंधित कार्यालयांतील आहेत. सत्ताधारी राजकीय पक्षांतील काही कार्यकर्ते देखील आम्ही नोकरी लावून देतो, असे म्हणत ङ्किरत आहेत.
प्रत्येक पदांकरिता दर ठरविण्यात आले आहेत. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहायक, कंत्राटी ग्रा‘सेवक या पदांकरिता आठ ते दहा लाख रुपयांपर्यंतचे दर आहेत. तर उर्वरित पदांकरिता बारा ते वीस लाख रुपयांपर्यंतचे दर आहेत. भरती प्रक्रीयेच्या भोवती आत्तापासूनच दलालांचा विळखा लागला आहे. त्या‘ुळे खुद्द जिल्हाधिकारी आणि ‘ुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भरती प्रक्रीया निष्पक्षपणे पार पाडण्याकरिता दलालांवर अंकूश लावून स्वतः याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.