वाशिम पंचायत समितीतील १५ कर्मचा-यांची दांडी

0
26

वाशिम : पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचारी हजरच राहत नसल्याच्या प्राप्त तक्रारीवरुन सभापती व सदस्यांनी अचानक भेट दिली असता, तब्बल १५ कर्मचारी गैरहजर आढळून आल्याचे २७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आले. २७ नोव्हेंबर रोजी सभापती वीरेंद्र विनायक देशमुख व पंचायत समिती सदस्य यांनी दुपारी ३.३0 वाजता अचानक पंचायत समितीमध्ये किती अधिकारी व कर्मचारी हजर आहेत, याची पाहणी करण्याचे ठरविले. पंचायत समितीमधील प्रत्येक कक्षाला भेट दिली असता, तब्बल १५ कर्मचारी गैरहजर आढळून आले. गैरहजर कर्मचार्‍यांमध्ये व्ही.एच.प्रधान, मनोज चव्हाण, गणेश भांदूर्गे, राजू उलेमाले, माळेकर, शिक्षण विभागातील एस.बी.सरनाईक, घुगे, नाचोने, दरोकर, देवळे, महाले, एस.एस.मोरे, आ.गो. भांदूर्गे , ए.टी.तायडे , करवते, यांचा समावेश आहे.