सुभाष हायस्कुल डोंगरगाव येथे ‘संविधान दिवस‘साजरा

0
17

 

देवरी,दि.२९-येथून जवळच असलेल्या सुभाष हायस्कुल डोंगरगाव येथे ‘संविधान दिवस‘साजरा करण्यात आला. डोंगरगाव-नवाटोला-सावली या गावात प्रभातफेरी काढुन उद् घोषांच्या माध्यमातून संविधानाबद्दल जनजागृती करण्यात आली.त्यानंतर शाळेत मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक टी एस कटरे प्रमुख अतिथी उपसरपंच श्री हिरालालजी लांजेवार, ग्रा.प.सदस्या श्रीमती हेमलताताई येटरे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री ब्राम्हणकर, वैद्यकीय अधिकारी श्रीमती डाँ ताराम, केंद्रप्रमुख श्री ए.आर.शेंडे,शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन व्ही ए येडेवार व आभार प्रदर्शन डी.आर.साखरे यांनी केले.