वर्ष झाले तरी, सामाजीक न्याय मंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही

0
24
अपंग दिनानिमित्त आमगांव येथे जिल्हस्तरीय अपंग मेळावा व युवक -युवती परिचय मेळावा
गोंदिया:दि.२९ -जिल्ह्यातील अग बांधवांसाठी सक्रीयतेने कार्य करणारी अपंग कल्याणकारी संघटनेच्या वतीने येत्या ३ डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आमगाव येथील गायत्री शक्तीपीठ समोर जिल्हास्तरीय अपंग बांधवाच्या मळावा तसेच प्रथमच आंतरजातीय अपंग यूवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष दिगंबर बन्सोड यांनी दिली. या त्रपरिषदेला संस्थेचे सचिव दिनेश पटले, संघटक श्याम संदर बंसोड, गोंदिया तालूका अध्यक्ष विनोद शेन्डे, सचिव आकाश मेश्राम, कोषध्यक्ष व ससचिव राखी चुटे, भोगांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.सकाळी ११.४० वाजता आयोजीत या मेळाव्याचे उद्घाटन देवरी, आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम असून सहउद्घाटन म्हणून भाजपाचे जिल्हा अध्यक्ष विनोदजी अग्रवाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोंदिया आमदार गोपालदास अग्रवाल उपस्थित राहणार आहे. मुख्य अतिथी म्हणून जी.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेशजी मोहिते, जि.प. उपाध्यक्ष रचनाताई गहाणे, समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, महिला व बाल कल्याण सभापती विमलाताई नागपूरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छायातार्द दसरे, जि.प. सदस्य सुखरामजी फुंडे, पं.स. सभापती  सौ. हेमलता डोये, उपसभापती ओमप्रकाश मटाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सूमारे ३० हजार अपंग आहेत. अपंगाना स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. मात्र त्याचा लाभ मिळतांना दिसत नाही. अपंगाना मिळणारे अनूदान, प्रमाणपत्र, तसेच आरक्षण अत्यंत तुटपंूजे आहे. या बाबतीत शासन तसेच शासकिय अधिका-याचे लक्ष आकृष्ट करण्यासाठी हा मेळाव्याला जिल्हातील अपंग बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन अपंग कल्याणकारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. अपंगाचे विवाह वेळेवर होत नाहीत. यासाठी यावर्षी मुद्याम आंतरजातीय विवाह योग्य युवक युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला जिल्हाभरातील अपंग बांधवांनी उपस्थि राहावे असे आवाहन अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
ब्लॉकमध्ये
राज्यातील युती सरकारला एक वर्ष पुर्ण झाले तरी राज्याचे सामाजिक न्या मंत्री ना. राजकूमार बडोले यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झालेली नसल्याचा आरोप अपंग कल्याणकारी संस्थेच्या पदाधिका-यांनी लावला.२ आॅक्टोंबर २०१४ रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर अपंगाच्या मेळाव्यात सामाजीक न्यायमंत्री मा. राजकुमार बडोले यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अपंगाना मिळणारे ६०० रूपये मानधन लवकरच १ हजार ते १२०० रूपये करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. अपंगासाठी वार्षिक उत्पन्नाची अट २१ हजारावरून ४० हजारापर्यंत वाढविली जाईल असेही आश्वासन दिले होते. या घोषणेला १ वर्ष झाले तरी सामाजीक न्या मंत्र्यांनी अपंगाना न्याय दिला नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे.