31 डिसेंबरला चोख बंदोबस्त ठेवा- चंद्रशेखर बावनकुळे

0
23

नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवावा. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

बिजलीनगर येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सहपोलिस आयुक्त राजवर्धन, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

31 डिसेंबर साजरा करीत असताना जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कुठेही अनुचित प्रकार घडत असल्यास तत्काळ पोलीस यंत्रणेला सूचना देऊन कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करा. नववर्षाचे स्वागत करताना कुणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी, असे आवाहनही श्री. बावनकुळे यांनी केले.

शहरातील तेलंगखेडी, फुटाळा तलाव तसेच महत्वाच्या चौकाच्या ठिकाणी जल्लोष करताना तरुण पिढीने संयम बाळगावा. तसेच वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारीही घेणे आवश्यक आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने पोलीस विभागानेही नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.