मंगेश पाडगावकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
18
मुंबई, दि. ३० – ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गाण्यातून रसिकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे मराठीतील महान कवी  आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्यावर बुधवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाडगावकर यांचे बुधवारी सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.
सहज सोप्या भाषेतील जगण्याची प्रेरणा देणा-या कवितांमधून पाडगावकरांनी रसिकांच्या हृद्यावर अधिराज्य गाजवले.  ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी’, ‘ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’,  ‘शुक्रतारा मंदवारा’ ही त्यांची गाणी विशेष गाजली. आजही ही गाणी अनेक रसिक गुणगुणताना दिसतात. त्यांच्या सलाम या कवितासंग्रहासाठी १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
कोकणातील वेंगुर्ला येथे १०  मार्च १९२९ साली मंगेश पाडगावकर यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषा विषय शिकवत होते. वयाच्या १४ व्या वर्षी पाडगावकरांनी कविता लेखनाला सुरुवात केली. ‘तुज पहिले हे पुष्प हृदयातले’ ही त्यांची पहिली कविता. ७० वर्षांहून अधिक काळ त्यांनी कविता लेखन केले. प्रसिध्द कवी विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासह १९६०-७० च्या दशकात महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात पाडगावकर सहभागी झाले. पाडगावकरांनी अनेक मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहीली. ‘