अदनान सामीला भारतीय नागरिकत्व

0
15

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए‘ सरकारने पाकिस्तानी गायक अदनान सामी याला 1 जानेवारी 2016 पासून भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज (गुरुवार) याबाबतची घोषणा केली. ऑगस्टमध्येच अदनाम सामीला अनिश्‍चित कालावधीपर्यंत भारतामध्ये राहण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती. सामीने भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. सामी 2001 मध्ये एका वर्षाच्या व्हिसासह भारतामध्ये आला होता. त्यानंतर त्याने वेळोवेळी व्हिसाचे नूतनीकरण केले. सामीच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याच्या नूतनीकरणास नकार दिला. त्यावेळी ‘पाकिस्तानमध्ये पाठविले जाऊ नये‘ अशा मागणीसाठी त्याने गेल्या मेमध्ये गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मानवतावादी भूमिकेतून त्याची ही मागणी मान्य झाली होती. कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे. 

केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना कठोर विरोध आहे. आता केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.