रामनगर पोलिसांनी  दोन महाविद्यालयात लावल्या तक्रारपेट्या 

0
18
 गोंदिया,  दि.३१ -महिलांनी व विद्यार्थीनींनी सक्षम व्हावे, त्यांनी कुणालाही न भिता निडरतेने जिवन जगावा यासाठी शहरातील रामनगर पोलिसांनी नवीन उपक्रम हाती घेतले असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात तेथील पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयात जावून तेथील महिला व विद्यार्थीनींना मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरक्षेचे धडे देत आहेत.
महिलांवर होणाèया अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून महिलात विशेषत: विद्यार्थीनीत दहशतीचे वातावरण राहते. दरम्यान या दहशतीतून त्यांना सावरता यावे महिला, विद्यार्थीनी सक्षम व निडर व्हाव्यात,  त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना व उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठौर यांच्या मार्गदर्शनात नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे. याच पाश्र्वभूमीवर काल, २९ जानेवारी शहरातील  एम आय टी महाविद्यालय व धोटेबंधू महाविद्यालयात रामनगर पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ठाणेदार पवार यांनी आपल्या पथकासह भेट देऊन तेथील विद्यार्थींनीना मार्गदर्शन केले तर या दोन्ही महाविद्यालयात ‘ महिला एवम युवतीयों निडर बनो, सचेत रहो ताकतवर बनो ङ्क असे फलक लावले तर त्या फलकावर टोल फ्री क्र. १०९१ व व्हाट्स अ‍ॅप मोबाईल क्र.९१३००३०५४८, ९१३००३०५४९ फलकावर देण्यात आले असून या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवहान केले आहे. त्याच बरोबर महाविद्यालयाच्या आवारात तक्रार पेट्याही लावण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शन कार्यक्रमाची अध्यक्षता ठाणेदार बाळासाहेब पवार यांनी केली. यावेळी महिला पोलीस निरीक्षक श्रीमती कोकाटे, सहाय्यक फौजदार भीमसींग चंदेल, पो. हवा. रहांगडाले, एमआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.