‘वर्ल्ड कप’साठी युवराज, हरभजन संघात

0
11

वृत्तसंस्था

मुंबई : दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन केलेल्या युवराजसिंग आणि हरभजनसिंगला आगामी ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघामध्ये किरकोळ बदल झाला आहे. आशिया करंडक आणि विश्‍वकरंडक या दोन्ही स्पर्धांसाठी समान संघ निवडण्यात आला आहे.
आशिया करंडक आणि विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ :
महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराजसिंग, अजिंक्‍य रहाणे, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्‍विन, हरभजनसिंग, जसप्रित बुमराह, आशिष नेहरा, पवन नेगी, महंमद शमी.