कचारगड यात्रेचा जिल्हाधिकार्यानी घेतला आढावा

0
11

सालेकसा:- आदिवासी समाजाचे आराध्य देवता व आदिवासींचे उगमस्थान ने प्रसिध्द असलेल्या कचारगड  यात्रेच्या वेळी भाविकांना कुठलीही अडचण व त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी  डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दरवर्षीप्रमाणे सुविधा व सुरक्षेच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी पर्यंत यात्रा आयोजीत करण्यात आली आहे.

२० फेब्रुवारीला गोंडी धर्माचार्य प्रेमसिंह दादा सलाम यांचे गोंडी पुनेम प्रवचनाने कार्यक्रमाला सुरवात होईल. रात्री राष्टÑीय गोंडीयन कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या वर्षी गोंदिया जिल्ह्याला लाभलेले नविन जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी यात्रेच्या आयोजनासाठी ३ फेब्रुवारीला कचागड गुफेची पाहणी केली.  पोलिस विभाग, आरोग्य विभाग, एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.