मौखिक आरोग्य दिन – रॅली व आरोग्य प्रदर्शनीचे आयोजन

0
51

गोंदिया,दि.५ : मुखरोगाचे विविध आजार व समस्यांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे (ता.५) मौखिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मौखिक आरोग्य दिनाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते यांनी केले. याप्रसंगी वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल परियाल, केटिएस रुग्णालयाचे डॉ. सतीश जायसवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी.जायसवाल, मेट्रन फुलझेले, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक चौरसिया प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी दांताचे आजार, दात सडणे, तोंडाचे आजार, तोंडाचा कर्करोग, वाकड्या दातांच्या समस्या, दातांची निगा यासर्व प्रकारच्या मौखिक आजारावर तज्ञ व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मौखिक आरोग्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी रॅली व आरोग्य प्रदर्शनीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी दंत आरोग्यक फरहान खान, दंत यांत्रिकी आरती कडव, स्नेहा गडलिंकर, निशांत बन्सोड, अनिरुध्द शर्मा, संजय बिसेन, रुपाली अकडे, सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.