तंबाखु व्यसन नियंत्रण समन्वय समितीची बैठक 

0
15

गोंदिया,दि.५ : राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखु व्यसनावर नियंत्रण मिळविण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. घनश्याम तुरकर यांची उपस्थिती होती. बैठकीत सर्व शाळा, महाविद्यालये, आरोग्य संस्थेत तसेच सर्व शासकीय व निमशासकीय परिसरात राष्ट्रीय नियंत्रण कायदा २००३ कोटपा अंतर्गत सक्तीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षणाधिकारी, प्राचार्य यांनी शाळेमध्ये तंबाखुचे सेवन करु नये तसेच १०० मिटर परिसरातील पानटपरी किंवा तंबाखुचे दुकाने या परिसरात राहू नये व आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. तंबाखुमूळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
बैठकीला कॅन्सर वॉरीयर ग्रुपचे डॉ. संजय भगत, कामगार अधिकारी जे.एम.बोरकर, जि.प.चे शिक्षणाधिकारी (माध्य.) ए.एम.फटे, आर.पी.बडे, अन्न व औषध विभागाचे जी.बी. नंदनवार, केटीएसचे दंत शल्यचिकित्सक डॉ. मनिष बत्रा उपस्थित होते.