बीडीओ हरिणखेडेंनी साधला विद्यार्थांशी सवांद

0
6

गोरेगाव,दि.5-गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे यांनी पंचायत समितीतर्गंत येणार्या  जि. प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्लीला भेट देऊन शाळेची पाहणी केली.तसेच स्वच्छतागृहाची पाहणी करून वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वतःचा परिचय देत विद्याथ्यार्कडून माहिती जाणून घेतली.तसेच इंग्रजी व गणित विषयावर काही प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. रूपेश दिहारी या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला.त्यावर “जगातील कोणतीच व्यक्ती ध्येय ठरविल्याशिवाय पदापर्यंत पोचत नाही.” आपले ध्येय ठरवा ! चिकाटीने अभ्यास करा. प्रचंड मेहनत घेतली की सर्व शक्य होते,असे समर्पक उत्तर दिले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बी. सी. वाघमारे ,सहा.शिक्षक अशोक चेपटे, टेकचंद भगत, हिवराज धपाडे, अनिल मेश्राम, डी. सी. कोल्हे, विजया शिकारे उपस्थित होते.Chepte Ashok's photo.