परशुराम विद्यालयात रक्तदान शिविर उत्साहात

0
15

गोरेगाव,दि.९ – तालुक्यातील मोहगाव बु. येथील परशुराम विद्यालयात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी विभागीय संक्रमण केंद्र गोंदियाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २६ युवकांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक डब्ल्यू.बी.रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी डॉ. हेडगेवार रक्तपेढी संक्रमण केंद्राचे विनायक नखाते उपस्थित होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवा कार्यकर्ता तेजलाल चन्ने याने रक्तदानासाठी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान करणाèयांना प्रमाणपत्र, रक्तगट कार्ड व टी-शर्ट वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पी.एम. चुटे यांनी आभार टी.आय. चन्ने यांनी मानले. आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.