अभिनेता सलमान खानच्या हस्ते १४ गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार

0
21

 

गोंदिया,दि.9- गेल्या २५ वर्षांपासून युवा वर्गाच्या हृदयावर राज करणारा प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान च्या हस्ते आज  ९ फेब्रुवारीला गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा व्यापक करणारे शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्ल पटेल होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, मिडीया गुरू सुहेल सेठ, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख ,आमदार गोपालदास अग्रवाल,स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल,आमदार राजेंद्र जैन,माजी आमदार दिलीप बनसोड,बंडु सावरंबाधे,अनिल बावनकर,सेवक वाघाङ्मे,रामरतन राऊत,मधुकर कुकडे,विलास श्रृगारपवार,नाना पंचबुध्दे, माजी आमदार हरीहरभाई पटेल, प्रजय पटेल, पूर्णा पटेल,श्रीमती प्रेमनारायण,सलमानचा सुरक्षारक्षक शेरा,राज केजरीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्र्यापण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवर पाहुण्यांचे प्रफुल पटेलांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

चित्रपट अभिनेता सलमान खान व मान्यवर अतिथींच्या हस्ते भाग्यश्री लालदास रंभाडे, वैष्णवी अशोक शेंडे,समृद्धी अंकुश मेश्राम,तेजश्री रेवाराम बालपांडे,प्रियंका अशोककुमार अग्रवाल, श्रद्धा गोपाल यादव,मायकल राजेंद्र सिंहारे, रिषी सुरेंद्रसिंह सलुजा,श्वेता अरविंद साठवणे,स्नेहल राजेंद्र रामटेके,रुपाली शामसुंदर शेंडे,सचिन योगराज तावडे, कु.बॉबी अजुम बबलु खांडेकर,प्रियंका रामकुमार जायस्वाल यांचा स्वर्णपदक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचलन आमदार राजेंद्र जैन यांनी केले. आभार नरेश माहेश्वरी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता मनोहरभाई पटेल सैनिक शाळेच्या विद्याथ्र्यांनी सादर केलेल्या राष्ट्रगीताने झाली.अभियांत्रीकी महाविद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थीनी,एनएसएस,सैनिक स्कुलचे विद्यार्थी व एनसीसीच्या विद्याथ्र्यांनी यावेळी स्वयसेवकांची भूमिका पार पाडली.