मोदींच्या मेक इन इंडियाची सुरवात गोंदियात आधीच-सुहेल सेठ

0
20

गोंदिया,दि.९- शिक्षण ही काळाची आहे.शिक्षण नसले तर व्यक्तींच्या विकासालाही बाधा पोचते हे सूत्र मनात हेरुनच स्व.मनोहरभार्इंनी शिक्षणाची दारे उघडली.आणि शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीला बदलण्यासोबतच घडविण्याचे महान कार्य केल्याचे विचार मिडीया गुरु सुहेल सेठ यांनी व्यक्त केले.  सेठ यांनी गोंदिया जिल्ह्यातील विकासाची स्तुती करत गोंदिया हे भारत देशाची शान आहे. वेंâद्र शासनाने अलिकडे मेकइन इंडिया सुरू केले असेल परंतु स्व.मनोहरभार्इंनी उद्योग आणि शिक्षणाच्या प्रचार-प्रसारातून ‘मेकइन इंडिया’ची संकल्पना कार्यान्वित केली. त्यांची स्वप्नपुर्ती गोंदियाकरांनी करावी, तेव्हा गोंदिया हे देशाचे आयकॉन ठरू शकेल असा आशावाद व्यक्त केला.

ते (दि.९) येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या सुवर्णपदक वितरण समारंभाचे उद््घाटन सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, मिडीया गुरू सुहेल सेठ, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख,आमदार गोपालदास अग्रवाल,स्व.मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल,आमदार राजेंद्र जैन,माजी आमदार दिलीप बनसोड,बंडु सावरंबाधे,अनिल बावनकर,सेवक वाघाङ्मे,रा‘रतन राऊत,‘धुकर कुकडे,विलास श्रृगारपवार,नाना पंचबुध्दे, माजी आमदार हरीहरभाई पटेल, प्रजय पटेल, पूर्णा पटेल,श्रीमती प्रेमनारायण,सलमानचा सुरक्षारक्षक शेरा,राज केजरीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्र्यापण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवर पाहुण्यांचे प्रफुल पटेलांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
सेठ पुढे म्हणाले की,गोंदियासारख्या ठिकाणी अशी शिक्षणाची सोय असेल अशी आपण कल्पनाच केली नव्हती.त्यातच या भागातील कृषी क्षेत्रामधील प्रफुल पटेलांचे योगदानही महत्त्वाचे ठरले आहे.त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारांचा वारसा आजही प्रामाणिकपणे जोपासत त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत आहेत.या मंचावर तीन विविध क्षेत्रातील लोकांचा सगंम असून तिन्हीही आपपल्या क्षेत्रातील मातब्बर असून रजत शर्मा हे तर जनतेला सचेत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याचे म्हणाले.सोबतच या जिल्ह्यात येऊन जे काही बघायला मिळाले ते बघून कदाचित पृथ्वीवरील इतर ठिकाणी बघितले असेल असे सांगत गोंदिया खरोखरच भारताची शान असल्याचे म्हणाले.
यावेळी बोलताना वरिष्ठ पत्रकार रजत शर्मा यांनी आपण गेल्या २०-३० वर्षापासून या क्षेत्रात कार्य करीत आहोत परंतु प्रफुल पटेलासारखे व्यक्तिमत्त्व बघायला मिळाले नाही.सत्तेसोबतच अनेक राजकीय नेते बदलतांना दिसली परंतु आजही प्रफुल पटेल जे आहेत तेच आहेत.दिल्लीत राहूनच गोंदियालाही तेवढेच महत्त्व देतांना दिसून येतात.प्रफुल पटेल असो की सलमान खान हे इतरासांठीच जिवन जगत असून आज या ठिकाणी येऊन नक्षलग्रस्त भाग म्हणून नावाजलेल्या भागातही शिक्षणाच्या एवढया मोठ्या सोयी असतील हे बघायला मिळाले.
अध्यक्षीय भाषणात खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, स्व.मनोहरभार्इंनी भंडारा गोंदिया जिल्ह्याला आपली कर्मभूमी मानली. त्यामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मला मिळाली. दूरदृष्टी आणि परिश्रमाच्या जोरावर मनोहरभार्इंनी स्वतः अल्पशिक्षित राहून येथे शिक्षणाची दारे उघडली.आमच्या गोंदिया-भंडारा जिल्ह्याची आदिवासी व नक्षलग्रस्त भागाच्या नावाने असलेली ओळख पुसून प्रगतशील गोंदिया भंडारा अशी ओळख मिळवून देण्यासाठी आपण कार्य सातत्याने करीत आहोत.आपल्या वडींना विकासासाठी आपली सकारात्मक भूमिका त्याकाळी वापरली.शिक्षणासोबतच qसचनालाही महत्त्व दिले.तोच धागा आपण कायम ठेवत वैद्यकीय वगळता सर्वच क्षेत्रातील अभ्यासक्रम आपल्या जिल्ह्यातील विद्याथ्र्यांना मिळत आहे.
समाजसेवेचे व्रत स्वीकारून शिक्षणात कोणी माघारू नये, म्हणून शिक्षणाची गंगा आणली. मनोहरभार्इंनी उघडलेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज विविध शाखेत १ लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या भागाच्या सर्वांगीण विकास साधायचा असून आपल्या सर्वांच्या सहकार्याची सुद्धा गरज असल्याचे पटेल म्हणाले. १८ हजार कोटी रुपयाच्या अदानी वीज प्रकल्प सुरू झाला आहे,भविष्यात अजून मोठे उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू असून कृषीच्या क्षेत्रात आमचा भाग नव्या क्रांतीकडे वाटचाल करीत असल्याचेही पटेल म्हणाले.यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल यांनीही विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचलन आमदार राजेंद्र जैन यांनी केले. आभार नरेश माहेश्वरी यांनी मानले.