चाहत्यांचा प्रचंड जल्लोष…..‘शादी होगी ना‘

0
24

खेमेंद्र कटरे
गोंदिया : लाखो चाहत्यांचा प्रचंड जल्लोष…आपल्या आयकॉनला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी शिगेला पोहचलेली तरुणाईची उत्सुकता…स्वागतासाठी टाळ्यांचा गडगडाट… अशा चैतन्यमय वातावरणात सर्वांच्या कानावर आवाज पडतो तो ‘सलमान खान हाजीर हो!…आणि सुरू होते अदालत.मुलाखत सुरू असतानाच युुवकांच्या घोळक्यातून मात्र भाईजान भाईजान … अशा घोषणांसोबतच सलमानभाई शादी …शादी……..असा आवाज जेव्हा येऊ लागला तेव्हा सलमानही शादी……असे म्हणत स्मित हास्य करीत ‘एक बार जो मैने कमीटमेंट कर ली…!ङ्क हा वॉन्टेड चित्रपटातील डॉयलॉग बोलून दाखवताच तरुणाईने एकच जल्लोष केला.

प्रसिद्ध वृत्तवाहिणी इंडिया टीव्हीचे प्रबंध संचालक मंचावर येतात आणि सुरू होते सलमान खानची अदालत. रजत शर्मा सलमानवर प्रश्नांचा भडिमार करतात, मिडीया गुरू सुहेल सेठ जजची भूमिका निभावतात. आणि आपल्या कौशल्यपूर्ण उत्तरातून लाखो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो तो सलमान खान. हा प्रसंग आहे गोंदिया येथील स्वनामधन्य नेता स्व. मनोहरभाई पटेल स्मृती स्वर्णपदक वितरण समारोहाचा.
उद्घाटन प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी खा.प्रफुल पटेल तर प्रमुख अतिथी म्हणून इंडिया टीव्हीचे प्रबंध संचालक रजत शर्मा, मीडिया गुरू सोहेल सेठ यांसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यानंतर रजत शर्मांनी सुरू केली सलमान खानची अदालत. सलमान खानला अनेक प्रश्न विचारून त्यांनी सलमानचे व्यक्तिमत्त्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न केले. गोंदिया बाबद आपल्याला काय वाटते, हा पहिला प्रश्न रजत शर्मांनी सलमानला विचारताच सलमानने गोंदियाकरांच्या प्रेमळ वृत्तीवर स्तुतिसुमने उधळली. बिरसी विमानतळापासून थेट कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचत असताना मला हजारो शालेय विद्यार्थी आणि विद्यार्र्थीनी दिसल्या. अनेक प्रकारचा पोषाख दिसला,त्यातही आपण १६ रंगाचे पोषाख मोजल्याचाही आवर्जून उल्लेख करतानाच स्पेशली विद्यार्थिनींच्या बाबतीत विशेष जोर देऊन ‘बेटी बचावङ्कचा संदेश सलमानने दिला. दरम्यान गोंदियाचा हा माझा तिसरा दौरा आहे. या तिन्ही दौèयात खूप तफावत नसली तरी या तीन दौèयांच्या दरम्यान गोंदियाचा विकास झपाट्याने झाल्याचे सांगितले. गोंदियाच्या पहिल्या दौरा म्हणजे स्व.मनोहरभार्इंच्या जयंती कार्यक्रमाचा.दुसरा २००९ चा लोकसभा निवडणुकीच्या काळातील दौरा आजही आठवणीतला कारण त्यावेळी चाहत्यांच्या गर्दीमुळे तुटलेल्या स्टेजच्या आठवणींना सलमानने उजाळा दिला.आणि सभा न घेताच परत जावे लागल्याचे सांगतानाच आमदार राजेंद्र जैनही त्यावेळी कसे गोंधळले होते ते राजू भैय्या के हाथ काप रहे थे असे सांगत आठवणींना उजाळा दिला.
कॅटरिना कैफ आपल्या यशाचे श्रेय आपल्याला देते याचे कारण काय? असा प्रश्न रजत शर्मांनी विचारताच सलमानने श्रेय न घेता कॅटरिना ही मजुरापेक्षाही अधिक मेहनत घेते. कॅटरिनाच्या मेहनतीमुळेच कॅटरिना त्या स्थानावर आहे. ती जर मला श्रेय देत असेल तर हा तिचा मोठेपणा असल्याचे सांगितले. आपण अनेकवेळा वादग्रस्त झालात यावर तुमचे काय म्हणणे आहे असा प्रश्न रजत शर्मांनी विचारताच सलमानने न कळत कधी-कधी चुका होतात असे म्हणून लहानपण घेतले.
पण आपण जेव्हा गोल्डमेडल मुलींच्या गळ्यात घालत होतो तेव्हा मात्र आपले हात थरथरत होते आणि मेडल लग्नाची माळ तर होणार नाही असे वाटत होते असे सांगतानाच मुले मात्र दोन-तीन पाहिजेत असे सांगत लग्नाची मात्र वय लोटली असे लग्नाबद्दल शर्मांनी विचारले असता, सलमानने सरळ-सरळ उत्तर न देता ‘शादी होगी नाङ्क असे बोलून लग्नाबाबद सस्पेंस कायम ठेवला.