सलमान,रजत शर्मा, सोहेल सेठची कृषी प्रदर्शनाला भेट

0
11
गोंदिया दि.9: भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे स्वनामधन्य नेता स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंती निमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्याथ्र्यांना स्वर्णपदक वितरीत करून गुणवत्तेला वाव देणे आणि मनोहरभार्इंच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी आयोजित  कुडवा येथील एमआयईटी प्रांगणातील भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्याआधी गोंदिया जिल्ह्यात उत्पादित होणार्या फळभाज्यासह विविध पिकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन सोहळ्याचे उदघाटक व चित्रपट अभिनेता सलमान खान,इंडिया टिव्हीचे प्रबंध संचालक रजत शर्मा,मिडीया गुरु सोहेल सेठ यांनी भेट दिली.खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया व भंडारा जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपारिक शेतीसोडून प्रगतशेतीकडे वळल्याचे आणि उत्पादित फळ व पिकांची गुणवत्ता तसेच शरीरासाठी कसे लाभदायक आहे, हे पटवून दिले.स्व.मनोहरभाई पटेल यांच्या जंयती सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.सोबतच अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आपले वैज्ञानिक ज्ञान पाहुण्यापुढे सादर करीत असायचे परंतु यावेळी पहिल्यांदाच जरा हटके असे आयोजन खासदार पटेलांनी पाहुण्यासाठी केले होते.ते म्हणजे जिल्ह्याला शोभेल असे कृषी उत्पादनावरील फळपिकांचे प्रदर्शन.गोंदिया जिल्ह्यातील प्रगत शेतकरी भालचंद्र ठाकूर,अंजली ठाकूर व राणू रहागंडाले यांच्यासह काही प्रगत शेतकर्यांच्या शेतातील फळपिक याठिकाणी ठेवण्यात आले होते.यावेळी धानाची हिरवी पेंडी सुध्दा पाहुण्यांना दाखविण्यासाठी ठेवण्यात आली होती.कोबी,पपई,केळी सोबतच स्ट्राबेरी,शेवग्याच्या शेंगा यासह अनेक फळ व भाजीपाले ठेवण्यात आले होते.प्रदर्शन बघतेवेळी वर्षा पटेल,आमदार राजेंद्र जैन,माजी मंत्री अनिल देशमुख,गोपालदास अग्रवाल,सेवक वाघाये,रामरतन राऊत,मधुकर कुकडे,बंडु सावरबांधे,नाना पंचबुध्दे,दिलीप बनसोड,मनोहर चंद्रिकापुरे,विनोद हरिणखेडे,गंगाधर परशुरामकर,अनिल बावनकर,पुर्णा पटेल,प्रजय पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.