नाभिक संघटनेच्या जिल्हा सचिवपदी सुरेश चन्ने

0
6

देवरी, ता. १५ :नाभिक समाज संघटनेच्या जिल्हा सचिवपदी सुरेश चन्ने यांची निवड करण्यात आली.आमगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली.
या वेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष पुंडलीकराव केळझरकर, सरचिटणीस अरुणराव जमदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. गुरुदेव येडेवार, कोषाध्यक्ष राधेश्याम मेश्राम, सहसचिव सतिश साखरकर संघटक किशोर कावळे आणि जिल्हा महिलाध्यक्षा अनिता चन्ने आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सुरेश चन्ने यांच्या निवडीबद्दल जिल्हा कार्यकारीणी, तालुका कार्यकारीणी, युवा संघटना आणि महिला संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.