राजेश नागरिकर यांना महाराष्ट्र समाज भूषण गौरव पुरस्कार 

0
10

गोंदिया, दि. १५ : सामाजिक कार्याची दखल घेऊन राजेश नागरिकर यांना महाराष्ट्र समाजभुषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विदर्भ  हिंदी साहित्य संमेलन सभागृह सिताबर्डी नागपूर येथे  पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकाश जायस्वाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रेखा महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र कुंभारे, सुदर्शन चक्रधर, रोहणी पंडीत, मिताली भिडे, निलीमा सिंह, संजय देशमुख, यशवंत कुर्वे, किरण वैद्य, दीपक सुचक उपस्थित होते. राजेश नागरिकर यांना लहान पणापासूनच सैनिक सेवा किंवा पोलिस सेवामध्ये जाण्याची आवड होती. परंतु संधी न मिळाल्यामुळे त्यांनी सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन दलीत, पीडित, शोषितांच्या उत्थानासाठी समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वीही नागरिकर यांना सामाजिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा यांची सामाजिक क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांना महाराष्ट्र समाज भूषण गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या सामाजिक कामगिरीचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, आमदार संजय पुराम, विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.सभापती पी.जी. कटरे, जि.प.सभापती देवराज वडगाये, जि.प.सभापती वि‘ल नागपुरे, छाया दसरे, जि.प.सदस्य कमलेश्वरी लिल्हारे यांनी कौतूक केले.