साहित्य मंडळाचा वसंत आया मस्त-मस्त

0
8

गोदिया, दि. १५ : भिन्न भाषी साहित्य मंडळ गोंदियाच्या स्थापनेला या वर्षी वसंत पंचमीला ६० वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्त वासंतिक बहराचा वसंत आया हा गीतगायन कार्यक्रम रमेश शर्मा यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र तिवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. रमेश शर्मा यांनी मान्यवर कवींच्या कविता, गीत आणि गझल सादर करून कार्यक्रमाला वासंतिक रंगत आणली. याप्रसंगी माणिक गेडाम, शशी तिवारी, छगन पंचे, अनिल भोजवानी हे अतिथी म्हणून उपस्थित होते. भिन्न भाषी साहित्य मंडळाचे शशी तिवारी यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.  नियोजन सर्पमित्र बंटी शर्मा आणि भिन्न भाषी साहित्य मंडळाचे निखिलेशसिह यादव यांनी केले होते.