२७ फेबुवारीला ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक

0
12

ओबीसीमधील सर्व जातीय संघटनेच्या प्रमुखांशी होणार चर्चा
गोंदिया,दि.१५-ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शनिवारला विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महिन्याच्या चौथ्या शनिवारला म्हणजे २७ फेबुवारीला ओबीसींतर्गत येणाèया सर्व समाजबांधवाची तसेच जात संघटनेच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे होते.यावेळी जिल्ह्यातून ओबीसी मंत्रालय व जनगणनेकरिता २५ हजार स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्याना देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.सोबतच सर्व ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी जनगणना व ओबीसी मंत्रालयाचा ठराव पारीत करण्याचे आवाहन ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना करण्यात आले आहे.राज्याचे मुख्यमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांच्याशी ओबीसी विषयावर चर्चा करण्यासाठी माजी आमदार हेमंत पटले व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांची भेट घेऊन वेळ ठरविण्यावर चर्चा करण्यात आली.सोबतच ओबीसी अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वयसाधण्यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी समन्वय समिती गठित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.सोबतच अमर वराडे,मनोज मेंढे,किशोर तरोणे,चंद्रकुमार बहेकार यांना कुणबी समाज,डॉ.संजीव रहांगडाले,बबलू कटरे,विलास चव्हाण यांना पोवार समाज,मुकेश शिवहरे,एल.यु.खोब्रागडे,तिर्थराज उके,देवेंद्र धपाडे यांच्याकडे कलार समाज,धन्नालाल नागरीकर,राजेश नागरीकर यांच्याकडे माळी मरार समाज,प्रा.रामलाल गहाणे,जीवन लंजे यांच्याकडे कोहळी समाज,संतोष खोब्रागडे,राजू वंजारी,कैलास भेलावे,राजेश चांदेवार यांच्याकडे तेली समाज,सुनील भजे यांच्याकडे सोनार समाज,राजेश कनोजिया यांच्याकडे धोबी समाज,आशिष नागपूरे,इंजि.संजिव ठकरेले यांच्याकडे लोधी समाज,कृपाल लांजेवार,अशोक चन्ने व गुरुदास येडेवार यांच्याकडे नाव्ही समाज,संजय राऊत यांच्याकडे गोवारी समाज संघटनेच्या प्रमुख पदाधिकाèयांशी संपर्क साधून बैठकीला निमंत्रित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तसेच ओबीसी मध्ये येणाèया इतर जातसंघटनाच्या प्रमुखांशीही ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी संपर्क साधून त्यांना येत्या २७ फेबुवारीच्या बैठकीत आमंत्रित करून ओबीसी समाजाला जिल्ह्यात एकसंघ करण्यासाठी विचार विनिमय करण्यात येणार आहे.बैठकीला खेमेंद्र कटरे,कैलास भेलावे,संतोष खोब्रागडे,पी.डी.चव्हाण,चंद्रकुमार बहेकार,डॉ.संजीव रहागंडाले,प्रमोद भोयर,विनोद चौधरी,प्रशांत बोरकुटे,राजेश नागरीकर,आशिष नागपूरे,मनोज मेंढे,भागचंद रहागंडाले आदी सदस्य उपस्थित होते.