देशी कट्टा बाळगणार्या दोन भावंडांना अटक

0
5
गोंदिया दि.15: देशीकट्टा बाळगणार्या दोन भावंडांना रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.१४) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास येथील शास्त्री वॉर्डात करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
मोतीलाल मांझी (३०) व खुदीराम उर्पâ बादल मांझी (२६) मु.पो. मुसाबनी जिल्हा पूर्व सिंगभत राज्य झारखंड अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सिव्हील  लाइन येथे अशोक चौधरी यांच्याघरी भाड्याने राहत होते अशी माहिती आहे.
बालाघाटकडून गोंदियाकडे देशीकट्टा घेऊन दुचाकीने दोघेजण येत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना रविवारी रात्री मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी शहरात नाकाबंदी करीत दुचाकी वाहनांची तपासणी केली. शक्ती चौकातही दुचाकी वाहनांची तपासणी करून चालकांची झडती घेण्यात आली. या वेळी पल्सर दुचाकीने आलेल्या मोतीलाल मांझी व खुदीराम मांझी यांचीही झडती घेण्यात आली. या झडतीत मोतीलाल मांझीकडे एक देशी कट्टा व तीन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी देशीकट्ट्यासह तीन काडतुसे जप्त करून आरोपी दोघांनाही अटक केली आहे. आरोपींचे वडील हे रेल्वे पोलिस विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. रामनगर पोलिसांनी आरोपीविरूद्ध कलम ३२५ भारतीय हत्त्यार कायदा सहकलम ३७ (१), १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक दराडे,पोलीस उपनिरीक्षक सत्यजीत ताईतवाले, गावडे,पोलीस हवालदार विजय रहागंडाले,राजू मिश्रा आणि चमूने केली.
पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले करीत आहेत. दरम्यान नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळेच बेकायदेशीर हत्यार बाळगणारे आरोपी हाती लागले. नागरिकांनी कुठलीही भिती न ठेवता अशा बेकायदेशीर हत्यारांची माहिती मिळताच पोलिसांना कळवावे. माहिती देणाNयांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब पवार यांनी केले आहे.