नागपूर महोत्सवामध्ये राज्य शासनाचा सहभाग राहील – मुख्यमंत्री

0
20

नागपूर : नागपूर महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंतांच्या कार्यक्रमाची मेजवानी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. नागपूर महोत्सवाच्या आयोजनासाठी दरवर्षी राज्य शासन सहभागी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

यशवंत स्टेडीयम येथे नागपूर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या नागपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करुन या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी नागपूरकर रसिकांसमोर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

केंद्रीय भू-परिवहन मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, खासदार सर्वश्री विजय दर्डा, अजय संचेती, कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री प्रकाश गजभिये, ना.गो. गाणार, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, आशिष देशमुख, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे सभापती रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती नयना गुंडे, नरेंद्र बोरकर, परिणय फुके, संदीप जोशी आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.