२४ हजार ४९० विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

0
17

आजपासून सुरूवात : ९७ केंद्रे निश्चित
गोंदिया,दि.२९ : इयत्ता दहावीची परीक्षा उद्या १ मार्चपासून २८ मार्चपर्यंत घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील २४ हजार ४९० विद्यार्थी बसणार आहेत. याकरिता परीक्षा मंडळातर्फे ९७ केंद्रे निश्चित केले आहेत.
इयत्ता दहावीचे वर्ष हे विद्यार्थी जिवनाला नवी दिशा देणारे आहे. कोणत्या शाखेत कुणी प्रवेश घ्यावा, हे गुणानुक्रमानुसार अवलंबून असते. त्यामुुळे अधिक परिश्रम घेतल्यास, पुढील पायरी चढण्यास व क्षेत्र निवडण्यास सोपे जाते. विद्याथ्र्यांचे भविष्य ठरविणारी परिक्षा म्हणून या परीक्षेकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील ९७ केंद्रांवरून ही परीक्षा विद्यार्थी देणार आहेत. ही परीक्षा सुरळीतपणे पार पडावी, याकरिता दक्षता समितीसह ६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (निरंतर) व महिला पथक यांचा समावेश आहे. विभागीय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक, अतिरिक्त केंद्र संचालक तथा प्रत्येक तालुक्याकरिता एक परिरक्षक असे आठ परिरक्षक केंद्रे नेमले आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार थांबविण्याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रापासून १०० मीटरपर्यंत प्रतिबंध क्षेत्र व क्षेत्रात स्वयंचलित झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर परीक्षेवर नियंत्रण ठेवण्याकरिता महसूल विभागाचे प्रमुख, संबंधित तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह सर्वांचा समावेश राहणार आहेत.