गोंदियात सेक्स ‘रॅकेट‘चा पर्दाफाश पाच महिलांसह एका युवकाला अटक

0
25
गोंदिया,दि.३१ :  पॉस एरिया म्हणून परिचित असलेल्या शहरातील सिव्हील लाइनमधील नुरी चौकातील एका घरात देहव्यवसाय चालत होता. याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (दि ३१) दुपारी तीनच्या सुमारास या अड्ड्यावर छापा मारला. यात पाच महिलांसह एका युवकाला रंगेहाथ अटक केली.
शहरातील सिव्हील लाइन परिसरात मागील काही महिन्यांपासून देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती होती. या आधी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला होता. परंतु, त्या वेळी पोलिसांना कसलेच पुरावे मिळाले नाही. त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. दरम्यान, पुन्हा सिव्हील लाइन परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी छापा मारला. यात एका महिलेच्या घरात पाच महिलांसह एक युवक देहव्यवसाय करीत असल्याचे पथकाला दिसले. या वरून पथकाने सहाही जणांना ताब्यात घेतले. पथकाने सिव्हील लाइनमधील ४२ वर्षीय दोन महिलांसह एका २४ वर्षीय तरूणीला तर, आमगाव येथील २६ वर्षीय व रामनगर गोंदिया येथील २५ वर्षीय तरूणीला ताब्यात घेतले. या शिवाय सुनील मन्नू गंगभोज (वय २३, रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया) याला रंगेहाथ पकडले. पथकाने या छापामारीतून चार मोबाईल हण्डसेटस, तीन दुचाकी  असा एकूण ६८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.